रावसाहेब, सर्वप्रथम आमचा प्रतिसाद वाचून आपण गैरसमज करून घेतला नाही त्यासाठी आभार.  आमचे मत स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न.

त्यामुळे मृत्यूचे सौंदर्य दाखवण्याच्या प्रयत्नातली भाषा हा - कदाचित फसलेल्या-  कलाकुसरीचा भाग आहे. जरा विचार केला तर त्यामागचा दृष्टीकोन दिसून येईल.

>>विषयानुसार भाषा असावी हे पटले. पण मृत्यूसारख्या गंभीर विषयावर लिहिताना ह्या भाषेच्या फुलोऱ्याने आपण वाचकांना त्या विषयावर विचार करण्यापासून दूर नेत आहात असे वाटते. त्यामागचा हेतू/ बोचणी किती जणांच्या लक्षात येईल?

आयुष्य सुंदर आहेच, पण ते सुंदर होऊन संपण्यात त्या सौंदर्याचा उत्कर्षबिंदू आहे, असे माझे मत आहे. स्वादिष्ट बासुंदीची वाटी जर सतत भरलेलीच राहिली तर तिची गोडी ती काय? एखादा राजेशाही मालकंस जर संपतच नसेल तर तो तितका भरदार वाटेल काय? त्यामुळे संपूर्ण ऐहिक विचार जरी केला तरी रंगल्या मैफिलीनंतर हात उंचावून 'येतो रे...' म्हणत निघून जाणे हीच त्या मैफिलीची सर्वोत्कृष्ट फलश्रुती आहे, असे मला वाटते.
म्हणूनच सुंदर असे आयुष्य जर मृत्यूने संपते तर तो शेवट करणारा मृत्यू सुंदर कसा असेल? हे मला पटत नाही.

>>
  आपण दिलेल्या सर्व उदाहरणांचा 'संपले' तरी पुन्हा आनंद घेता येऊ शकतो. पुन्हा तशी बासुंदी, अन मालकंस मिळू शकतात. सुंदर असे अगदी स्वप्नातले आयुष्य जगायला मिळाले तरी त्याची फलश्रुती मृत्यूने व्हावी असे प्रत्यक्ष वास्तवात कुणाच्या मनात येईल? कारण ते आयुष्य पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही.  शिवाय असा समाधानी मृत्यू किती जणांच्या भाग्यात असेल? आपले विचार म्हणूनच वास्तवातले वाटले नाहीत. एकच बाजू मांडली आहे असे वाटले.

शेवटच्या परिच्छेदात मी मला मृत्यू कसा यावा याची माझी आदर्श कल्पना सांगितली आहे. म्हणूनच परिच्छेदाची सुरुवात 'मला वाटतं ते असं..' अशी आहे. हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष आहे. इतरांना काय वाटेल हे मी कसे ठरवणार?

>>
शेवटच्या परिच्छेदात आपण आपली आदर्श मृत्यूची कल्पना सांगितली ते आम्हाला समजले. म्हणूनच आपण हा गहन विषय आपल्यापुरता  सोडवला असे वाटले. वाचकांकडून विषयावर चर्चा व्हावी असे हे लेखन झाले नाही. याचे कारण लेखातली भाषा असे आम्हाला वाटते.
इतरांना काय वाटेल ते आपल्या हातात नाही पण त्यावर विचार करायला लावणारे लेखन व प्रतिसाद नक्की आपल्याला करता येईल असे वाटले. निदान हा लेखनविषय तरी त्या सदरात मोडायला हरकत नाही.  म्हणून आम्ही प्रतिसाद दिला. तसा उद्देश नसेल तर आमच्या म्हणण्यावर विचार करू नये.
चू. भू. द्या. घ्या.