ही वाक्ये आपल्या पद्धतीने

  1. थोडे डिटेल्स सांगशील.
    थोडे तपशीलात सांगशील?
  2. मला डिपॉझिट ठेवायचे आहे, इंटरेस्ट रेट काय आहे?
    मला पैसे गुंतवायचे आहेत, व्याजाचा दर काय आहे?
  3. त्या नर्सला सांगशील.
    त्या ताईला/दादा ला सांगशील? (आता सिस्टरला काय म्हणणार!)
  4. रिक्षा कोठे मिळेल?
    'बजाज' कोठे मिळेल? ( काही देशात आटो रिक्षाला बजाज म्हणतात)
  5. एक ग्लासभर पाणी दे बरे.
    भांडभर पाणी दे पाहू.
  6. तुमचे बजेट काय आहे?
    किती खर्चाची तयारी आहे? (हंतरूण केवढे आहे?)
  7. सेलीब्रिटिज चा जमाना आहे.
    उत्सवमूर्तींचे युग आहे.
  8. त्याला त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.
    दवाखान्यात/इस्पितळात (दोन्ही परभाषी!) दाखल (पुन्हा परभाषी!) केले आहे/ टाकले आहे.
  9. मला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे.
    घसा बिघडला आहे.
  10. सध्या मुलगी प्रेग्नंट दिसते, कधी एक्स्पेक्टेड आहे किंवा डेट काय सांगितली आहे.
    ताईकडे गडबड दिसते, कितवा महीना आहे? (अधिक माहितीची काय आवश्यकता? फक्त महिना पुरे)