1. थोडे डिटेल्स सांगशील.
    थोडे तपशीलात/सविस्तर सांगशील?
  2. मला डिपॉझिट ठेवायचे आहे, इंटरेस्ट रेट काय आहे?
    मला पैसे गुंतवायचे आहेत/पैसे ठेव म्हणून ठेवायचे आहेत, व्याजाचा दर काय आहे?
  3. त्या नर्सला सांगशील.
    त्या परिचारिकेला सांगशील?
  4. रिक्षा कोठे मिळेल?
    वाहन कोठे मिळेल?
  5. एक ग्लासभर पाणी दे बरे.
    भांडभर/पेलाभर पाणी दे पाहू.
  6. तुमचे बजेट काय आहे?
    किती खर्चाची तयारी आहे?
  7. सेलीब्रिटिज चा जमाना आहे.
    उत्सवमूर्तींचे युग आहे.
  8. त्याला त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.
    शुश्रुषालयात भरती केले आहे.
  9. मला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे.
    घशाला जंतूसंसर्ग झाला आहे.
  10. सध्या मुलगी प्रेग्नंट दिसते, कधी एक्स्पेक्टेड आहे किंवा डेट काय सांगितली आहे.
    मुलगी पोटुशी दिसते, कितवा महीना आहे? तारीख काय सांगितलेली आहे.