रावसाहेब, लेखातील विचार मनापासून आवडले.
आयुष्यातील प्रत्येक घटना कशी घ्यायची हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. ज्या दृष्टीला आयुष्याचे सौंदर्य दिसते त्या दृष्टीला मृत्यूही सुंदरच दिसायला हवा. एकच स्थिती कायम राहणे हा कंटाळवाणाच प्रकार होणार, जसे वर्षभर केवळ एकच ऋतू असता तर आयुष्य एकसुरी आणि बेचव झाले असते. उन्हाळा आहे म्हणूनच पावसाळ्यात अधिक रंगत येते. त्यामुळे मृत्यू हा यशस्वितेच्या पूर्णत्वाचा भाग म्हणून स्वीकारणे ही कल्पना खूपच छान आहे.