Alice in Wonderland ची एकापेक्षा अधिक मराठी भाषान्तरे केली गेली आहेत.

जाईची नवलकहाणी व नवलनगरीत नन्दा ही त्यापैकी दोन.

यापैकी जाईची नवलकहाणी श्री. भा. रा. भागवत यांचे असून नवलनगरीत नन्दा चे लेखक/भाषांतरकार मला आठवत नाहीत.

ही दोन्ही पुस्तके कुठेही उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत नाही. तथपि कोणाला ती मिळाल्यास मुलांनी जरूर वाचण्यासारखी आहेत.

Alice ... चे मूळ लेखक Lewis Carrole,  यांचे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध आहे, ते म्हणजे Through the Looking Glass.  याचेही भाषांतर श्री. भा. रा. भागवत यांनी केले असून त्याचे नाव आरसेनगरीत जाई असे आहे, व ते सुद्धा वाचनीय आहे.