मी या विषयावर चर्चा सुरू केली त्या वेळी मी 'न' आणि 'ण' चे उदाहरण दिले होते. पण आता मला असे वाटू लागले आहे की तेथे मी 'श' आणि 'ष' चे उदाहरण द्यावयास हवे होते.
मराठी भाषेमध्ये अनेक बोली भाषा आहेत. ग्रामीण भाषा ही सुद्धा त्यातील एक. इंग्रजीमध्ये नाही का British English, American English, Australian English अश्या अनेक बोली आहेत.
जर मला ग्रामीण भागातील काही संवाद माझ्या कथेमध्ये लिहायचे असतील तर मी "का रं गनपा, बरनी फोडलीस की" असंच लिहीणार. यातील 'गनपा' हा शब्द अशुद्ध आहे असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
केवळ निष्काळजीपणा मुळे जर 'ण' चा 'न' होत असेल तर ते टाळावयास हवे.
माझा आग्रह मात्र काही मु(मू?)लभु(भू?)त नियमांबाबत आहे.
उदा.
'आणि' मधला 'णि' हा पहिला हवा.
'षब्दकोश' नव्हे '.शब्दकोष' इ...
माझ्या मते आता बोली भाषांमुळे वादग्रस्त नसलेल्या नियमांबाबत आपण चर्चा चालू ठेवू.