थोडेसे विषयांतर करतो आधी,
हे ऑर्कूट जेव्हा आले ना, तेव्हा इंटर्नेट वापरणारी आपली पीढी जुनी झाली असे वाटले. ऑर्कूट्ची फार माहिती करून घ्यावेसेच वाटेना. यापुर्वीही युजनेट जाऊन ईग्रुप्स आले. ईमेल च्याजोडीला मेसेंजर्स आले. इंटर्नेट वरील अनेक प्रोटोकॉल जाऊन वेब प्रधान बनले, त्या वेळेस असे वाटले नव्हते. असो, पण नंतर लोक लज्जेस्तव OrkUtवरही जाणे सुरू केले.

आत प्रश्न:
४) सायबर पोलिसिंग ही नवी संस्कृतिरक्षकांची भूमिका योग्य आहे का?
जेव्हा स्वयंशिस्तीने लोकं रहात नाहीत तेव्हा पोलिसींग करावे लागते. लोकांनी शिस्त पाळावी, म्हणजे संस्कृतीरक्षणाची गरज रहाणार नाही.

६) ऑर्कुटवर शिवाजी महाराज आणि अलीकडे ब्राह्मण स्त्रियांविषयी अश्लील लिखाण याशिवाय काही अजून वादग्रस्त यापूर्वी होते का? किंवा अजून आहे का?
चिखलफेक करणारे लोक असणारच. त्यांना ऑर्कूट हे नवीन माध्यम मिळाले एवढेच. वरील विषयांना वाहिलेल्या वेब साईट्स, ईग्रुप्स सुद्धा आहेतच. पुर्वी याहूग्रुप वर भारतात बंदी घालण्यात आली होती. ती नंतर उठवण्यात आली. अश्या लोकांना आपण धरून धोपटू शकत नसू तर बोटे मोडण्यापलीकडे हाती काही रहात नाही.

७) ऑर्कुटवरील वादग्रस्त वेबपेजेस काढून टाकण्याची पद्धत काय?
वर सांगितलेलीच, 'क' संख्येच्या लोकांनी report abuse  केले तर ते वेबपेज नष्ट होते. आता क किती ते माहिती नाही.