सुंदर लेख! मात्र फक्त दोनच मुद्द्यांवर किंचित मतभेद आहेत.
डार्विनसाहेब म्हणूनच गेले आहेत की मानव हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे. याला अनुरूप अशी सुरुवात करावी.माकडे माकडे होती तेव्हा सर्व ठीक होते. माकडाचा माणूस झाला तेव्हा खरी गडबडीला सुरुवात झाली.
माकडाने साबणगाथा लिहिल्याचे कधी ऐकले आहे? माकडांना त्याहून इतर खूप चांगले उद्योग असत. ती करामत माणसाची!
ह्याने संगणन शास्त्रातील एका महत्त्वाच्या नियमाचे अधोरेखन होईल. तो म्हणजे, "काही माकडे अनंत काळ कळपट बडवीत बसली तर शेक्सपियरचे हॅम्लेट पूर्ण करतील."हा नियम संगणनशास्त्रातला की सांख्यिकी/प्रॉबॅबिलिटीतला, या बारीक मुद्द्याकडे दुर्लक्ष केले, तरी असे सुचवावेसे वाटते, की काही माकडे अनंत काळ कशाला, मर्यादित काळ जरी कळपट बडवत बसली, तरी हॅम्लेटच काय, पण शेक्सपियरच्या समग्र वाङ्मयापेक्षा अर्थवाही काहीतरी टंकून जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
वुडहाउसच्या एका पात्राने (नेमका संदर्भ आठवत नाही) शेक्सपियरबद्दल म्हटल्याप्रमाणे: "Sounds impressive, but doesn't mean a thing!"
- टग्या.