रिक्शाला मराठी शब्दच सध्या प्रचलित नाही असे नाही. कोठे कोठे मी टमटम अथवा डुक्कर असा शब्द ऐकला आहे आणि सर्वसाधारण पणे तो बऱ्यापैकी वापरलाही जातो.

रिक्शाला जर गरीब रथ असा शब्द वापरला तर काय हरकत आहे? लालू यांच्या रेल्वेच्या अंदाजपत्रका वरील भाषणात मी हा शब्द ऐकला आणि रिक्शाला मराठीमध्ये बऱ्यापैकी शब्द मिळाला अशी माझी समजूत झाली.

खरे तर शशी भागवतांच्या पुस्तकात शिबिका असा शब्द वाचला आणि मला रिक्शाला यापैकी चांगला शब्द असेल असे तरी वाटत नाही.

तरी पण संस्कृतच्या जास्त आहारी न जाता गरीब रथ असा शब्द मला जास्त आवडतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यायी शब्द सुचवावा असे अपेक्षित आहे. चांगला असेल तर नक्कीच स्वीकारला जाईल. मुख्य म्हणजे मराठी साकळण्याची जी क्रिया चालू आहे त्याला पर्यायी शब्दांनी थोडाफार प्रतिबंध बसेल अशी माझी कल्पना आणि ( मराठी प्रेमी म्हणून ) इच्छा आहे