नमस्कार,
आपल्या बुद्धीला आणि लेखन कौशल्याला दाद.
आपण इतके गुंतागुंतीचे आणि कठिण विचार अतिशय सुंदर ओघाने आणि प्रभावी दृष्टांतांनी मांडले आहेत. अनंताचे तीनही भाग आत्ता एकदमच वाचले. दुसरा भाग वाचताना तर मी विवेकानंदांच्या ज्ञानयोगावरील प्रवचनाचा कोठला भाग तर वाचत नाहीये ना असे वाटले. तीनही भाग फार आवडले.
आपण अनंताचा विचार जिथे मिती चा विचार आहे तेथेच करतो असा माझा समज आहे. उदा. संख्या, लांबी, खोली इ. मग मन, बुद्धी अशा अमूर्त संकल्पनांचा विचार वेगळ्या परिभाषेत करावा लागेल का? बुद्धी ही एक मोठी ऊर्जा आहे आणि ती अगणित कामे करू शकेल, अमर्याद ताकद असलेली आहे वगैरे असे म्हटले तरी बुद्धी कशी आहे हे कसे सांगणार ? असा मला प्रश्न पडला आहे. कोणत्याही अमूर्त कल्पनेचे (येथे बुद्धी) वर्णन करायचे तर या संकल्पना मिती मध्ये आणून मगच त्यांचे वर्णन करणे शक्य आहे. त्याच मुळे मला वाटते की बुद्धी पेक्षा जी अजून सूक्ष्म तत्त्वं आहेत, त्यांचे वर्णन आपण करू शकत नाही आणि मग त्यासाठी 'तदेजती तन्यैजती' असे काहीसे म्हणावे लागते. मी विषय सोडून बोलत नाही आहे ना !
आपण पुढील भागात मन, बुद्धी यांबद्दल काय लिहिणार आहात त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
आपलाच,
--लिखाळ.