वैविध्य आणि विविधता हे दोन्ही शब्द 'विविध' ह्या शब्दापासून तयार झाले आहेत. विविध हा मूळ संस्कृत शब्द असावा, ते विशेषण आहे. आता विशेषणाचा उपयोग सामान्यनाम,भाववाचक नाम म्हणूनही होऊ शकतो याची आपल्याला कल्पना आहे. वाक्यातील संदर्भ व त्या शब्दाचे कार्य यावर ते ठरते.

वैविध्य मध्ये 'य' हा प्रत्यय आहे आणि विविधता मध्ये 'ता' हा प्रत्यय लागून ही भाववाचकनामे तयार झाली आहेत. हा फरक त्या दोन शब्दात आहे. शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने मात्र आम्हाला त्यातील फरक लक्षात आलेला नाही.

कित्येक वेळा बोलीभाषेतून एखाद्या शब्दाचा उगम होतो आणि मग भाषातज्ज्ञ त्याची कारणे शोधतात. गरज आहे म्हणूनच हा शब्द निर्माण झाला असेल असे सांगता येणार नाही.

चू. भू. द्या. घ्या.