सगळे लिहीतात, वाचणारे पण वाचतात.
पण जेव्हा हॉस्पीटलच्या खाटल्यावर डायाबेटीस, हाय बी पी, किडनी फेल्युर होउन त्या आय सी युत भर्ती व्हावे लागेल तेव्हा कळेल मरण यातना काय असतात.
मी एक ऍक्सीडेंट प्रत्यक्ष पाहिला होता, बोलेरो गाडीतली सगळी मंडळी मेली होती, बहुतेकांचे डोके कलींगड फुटावे तसे फुटून मास मसाला बाहेर लोंबत होता.
एक दुसरा ऍक्सीडेंट पाहिला होता,  मोटर बाईक वाल्याचे व मागे बसलेल्याचे धड व मुंडके वेग वेगळे झाले होते.  पोलीस विचारत सुटले होते कोणाला माहीत आहे का धड कोणाचे कोणते आहे ?
एक माणूस रस्त्यात हार्ट ऍटॅक येऊन मेला, बिचाऱ्याच्या खिशात काहीच ओळख पत्रे नव्हती, त्याचे बिचार्याचे अंत्यसंस्कार म्युन्सीपाल्टीने केले म्हणे. दोन महिन्यानंतर त्याच्या पोराला कळले आपला बाप असा मेला.
लेख व वास्तव वेगळे असते साहेब.