सर आर्थर कानन डॉइल यांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास होता. त्यांचा एक मित्र मृत्यूशय्येवर होता. "मी त्याला उद्या भेटायला जाईन" ते म्हणाले. "अहो, पण तो आजची रात्र टिकेलसं वाटत नाही...." कुणीतरी म्हणालं. "बरं, मग मी त्याच्याशी पुढच्या आठवड्यात बोलीन."आर्थर कानन डॉइल म्हणाले!