सौ. रोहिणीताई यांनी आजच्या चर्चा सदरात वरील बाबतीत प्रश्न विचारला आहे.
माझ्यामते गुळाचा पाक करणे ही अधिक अवघड कृति आहे. गुळाच्या जातीवर त्याचा पाक होणे/करणे खूप अवलंबून असते. गुळाच्या वेगवेगळ्या प्रति कशा होतात ते मला नीटसे माहिती नाही. त्यात उसाची जात, वापरायच्या काहिली, आंच लावण्याची क्रिया, ढवळण्याचा वेग, आच किती प्रमाणात किती वेळ द्यायची, त्यात मळी काढण्यासाठी काही वेगळी रसायने/घटक वापरले आहेत का वगैरे अनेक बदल असू शकतात.
चिक्किचा गूळ वापरून पाक केला तर तो कडक न होता मऊसर होतो असे वाटते. इथे अमेरिकेत सहसा चिक्कीचा गूळ मिळत नाही असे वाटते.
काय रोहिणीताई तिळगुळाची तयारी सुरू झाली का? आम्हालाहि पाठवा तुमचा तिळगूळ
कळावे लोभ (तिळगूळ) असावा,
सुभाष