लिखाळ,
लेख वाचतांना आपल्याला विवेकानंदांच्या प्रवचानातील कोठला भाग तर वाचत नाहीये असे वाटल्याने मी धन्य जाहलो एवढेच म्हणू शकतो. त्यांचासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वांच्या प्रकाशात अनेक आयुष्यं उजळून निघतात. आपली ही प्रतिक्रिया वाचणं हा माझ्या लेखनातील सर्वोत्तम क्षण आहे. मला वाटते की सत्य हे कोणत्याही मार्गाने प्राप्त केले तरी बदलत नाही. म्हणूनच सत्य हे खूपच सुंदर असते. अनंताचा शोध हा अज्ञाताच्या शोधासारखाच आहे. कारण, सध्यातरी अनंताची बुद्धीलासुद्धा अनुभूती होत नाही.
मूर्त आणि अमूर्त संकल्पना तसेच मितींबद्दल आपले विचार आवडले. आपण विषयाला धरूनच बोलत आहात. त्यांचा मागोवा पुढे घेईलच. अनंत या विषयावर लिहिलेले हे लेख मी बरेच आधी लिहिले होते. साधारण प्रत्येक लेखामध्ये काही महिन्यांचे अंतर आहे. पुढील लेखासाठी विचारचक्र सुरू केले आहे. जेव्हा विचारांना मूर्त रूप येईल तेव्हा शब्दबद्ध करेलच. आपल्याशी चर्चा करून अजून बरेच काही शिकता येईल असे वाटते.
स्नेहांकित,
शैलेश