लिखाळ,
  शिजवलेल्या डाळीतून एक डावभर डाळ बाजूला काढून घ्या. डाळ शिजवून उरलेले जास्तीचे पाणी एका भांड्यात ठेवा.
फोडणीसाठी लसणाच्या ५/६ पाकळ्या आणि वाटीभर भाजलेले खोबरे मिक्सरमधून वाटून घ्या.
 मसाल्यासाठी : कांदा भाजून (गॅसवर भाजून घेतला तर तळलेल्या कांद्यापेक्षा अधिक खमंगपणा येतो) ,भाजलेल्या ३/४ लवंगा,३/४ मिरे, वाटलेल्या लसूणखोबऱ्यातील अर्धे वाटण आणि शिजलेली डाळ घालून वाटून घ्या.

कृती:
कढईत २ डाव तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि लसूण खोबऱ्याचे वाटण परता. लालसर झाल्यानंतर वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, काळा मसाला, गडद लाल तिखट   (पॅप्रिका), मीठ घालून चांगले परता मग भांड्यात काढून ठेवलेले पाणी घालून उकळी आणा व आणखी काही पाणी घालून मध्यम आचेवर उकळू द्या. हवीतर पुन्हा वरतून थोडी कोथिंबीर घाला.

श्रावणी