भाष, आपण दिलेला दुवा आणि तेथील चर्चा वाचली. तरूण व तरूणाई यांच्या अर्थछटा वेगळ्या आहेत.
एका विशेषणापासून जर वेगळे प्रत्यय लागले तर निराळी भाववाचक नामे तयार होतात. त्यांचा अर्थ देखील वेगळा असू शकतो. त्यामुळे एखादा शब्दप्रयोग बरोबर की चूक ते ठरवण्यासाठी वाक्यात एखादा शब्द (भाववाचक नाम) कोणत्या अर्थाने वापरला आहे ते बघणे आवश्यक आहे.
जसे तरूण पासून तारूण्य हे 'य' प्रत्यय लावून नाम तयार होते, तसेच तरूणाई हे 'ई' प्रत्यय लावून तयार होईल. ह्या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे.
वाक्यरचनेत असे नवे नवे प्रयोग जर वेगळी अर्थछटा दाखवण्यासाठी होत असतील तर त्यांचा स्वीकार जरूर व्हावा असे वाटते.
अनवधानाने चुकीचे शब्दप्रयोग होत असतील तर ती जाणीव करून देणे सुद्धा महत्त्वाचे आहे.