सर्वे रुटिन: जंतु ।
सर्वे जंतु निराशय: ॥
सर्वे छिद्राणि पंचन्तु ।
मा कश्चित सु:खलॉग भरेत ॥

ही बा‌. सी. मर्ढेकरांची कविता नाही, हे विडंबन आहे.
मूळ सुभाषित असे आहे:

सर्वे सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया: ॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित दु:खमाप्नुयात ।।

ह्यावर कापड गिरणी कामगारांच्या दु:खाची झालर स्पष्टच दिसते.
त्या अर्थाने एक नवे परिमाण त्यामुळे कवितेस मिळाले होते.

'औदुंबर' ह्या बालकवींच्या छोट्याशा कवितेने जसे धृवपद प्राप्त केले,
तसेच अढळपद मर्ढेकरांच्या ह्या विडंबनानेही प्राप्त केलेले आहे.