समृद्ध हे मुळात कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे. धातूपासून तयार झाला असल्यामुळे तो कृदन्त आहे. पाणिनीच्या सूत्रानुसार कृदन्ताचे भाववाचक नाम करताना त्याला इ हा स्त्रीलिंगवाचक प्रत्यय लागतो पण ता किंवा त्व हा प्रत्यय लागत नाही. त्यामुळे समृद्ध या कृदन्ताचे भाववाचक नाम समृद्धी असेच होते. समृद्धता हा शब्द संस्कृत व्याकरणाप्रमाणे चूक आहे. मागे झालेली चर्चा संस्कृत व्याकरणाला धरून होती असे दिसले म्हणून हा खुलासा.
दुसऱ्या प्रकारची नामे म्हण्जे नामापासून तयार झालेली भावाचक नामे.  
नामांना ता आणि त्व प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात त्यांना तद्धित असे म्हणतात.
शिवाय समृद्धी हाच शब्द प्रचलित आहे. समृद्धता हा शब्द यापूर्वी वाचनात आलेला नाही. त्यामुळे समृद्धता हा शब्द कानाला निश्चितपणे खटकला. प्रतिज्ञेमधे समृद्ध असा शब्द आहे समृद्धता असा नाही याची मी खातरजमा करून घेतली आहे.
जीजि स्वतःच वर म्हणाले त्याप्रमाणे अनावधानाने चुकीचा शब्दप्रयोग टाळायला हवा. म्हणूनच माझ्या मते समृद्धता हा शब्द बरोबर नाही. मराठीत व्याकरणाचे नियम संस्कृतपेक्षा सैल आहेत अशी पळवाट यातून निश्चितपणे निघू शकते पण ती कोणी काढायचा प्रयत्न केल्यास समृद्धता हा प्रचलित शब्द नसून लेखकाच्या बुद्धीतून जन्माला आलेला नवीन शब्द आहे हे ध्वनित करून ठेवले म्हणजे बरे.
--(समृद्ध)अदिती