अभ्यासपूर्ण प्रतिपादनाबद्दल धन्यवाद.
विशेषणांपासून ता किंवा त्व लावून भाववाचक नाम तयार कधी करावे आणि विशेषणांमध्ये (गुणफरक इत्यादी) विकार करून भाववाचक नाे कधी करावे ह्याबद्दल काही मार्गदर्शन आहे का?
म्हणजे
विपुल पासून विपुलता कधी करावे आणि वैपुल्य कधी करावे?
प्रबल पासून प्रबलता कधी करावे आणि प्राबल्य कधी करावे?
(शिवमहिम्नस्तोत्राच्या समश्लोकी भाषांतराच्या प्रस्तावनेत भाषांतरकाराने 'पुष्पदंताच्या रचनेचे दार्ढ्य' असा शब्दप्रयोग केलेला आहे, तो वाचून मला प्रश्न पडलेला आहे की दार्ढ्य का? दृढता का नाही?)
असे.