मनोगत अशात बंद असतानाच्या काळात गमभन वापरण्याचा योग आला. चांगली सुविधा आहे धन्यवाद. मला बहुधा 'य' सोबतचा पोटफोड्या रफार कसा बनवायचा याची कल्पना नाही , या बाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती.
मला संगणक तंत्रज्ञानाची खुप माहिती नाही पण काही सुचलेल्या कल्पना लिहीत आहे.आपल्या कडे खुप चांगले कौशल्य आहे म्हणून, आपणास शक्य असेल ते घडावे ही शुभेच्छा
- क्ष kSha असा सुद्धा देता येईल काय
- ज्ञ dnya असा सुद्धा देता येईल काय
- मनोगत व बराहा दोन्हीच्या कळफलकांशी शक्य असेल तीथे प्रमाणी करण करावे व साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करावा.
- या संकेत स्थळावर एक वैशीष्ट्य पूर्ण सुविधा आढळली , मला उपयोग झाला. अंतर्भाव करणे जमेल का?
- मला अशात श्रीलिपी , आयलिप या दोन्हीचे युनिकोडीकरण करून हवे होते , तसेच महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळाचे मराठीचे पण युनिकोडीकरण कुणी करू शकेल तर छान होईल.
-विकिकर