गोळेकाका,
'सर्वे जन्तु रूटिनाः । सर्वे जन्तु निराशयाः ॥' या ओळी 'मी एक मुंगी' या कवितेत अखेरीस येतात. त्यातील एक कडवे -
दहा दहाची लोकल गाडी
सोडित आली पोकळ श्वास;
घड्याळातल्या काट्यांचा अन
सौदा पटला दीन उदास.
यावरून ही कविता गिरणी कामगारांच्या संदर्भात नसून कचेऱ्यातल्या कर्मचाऱ्यांच्या नित्याच्या धावपळीवर आहे (सं. तरीही येतो.. - पृ. क्र. ७) हे स्प्ष्ट होते. शिवाय कवितेत 'पाच येथल्या पाच फिरंगी', 'सु:खलॉग ' हे उल्लेखपण हेच दाखवतात.
-ओंकार.