खूप जुना धागा (थ्रेड) आहे, आज चुकून दिसला. माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. :) लिहिल्याशिवाय राहवले नाही.

कालच जुना (रेखाचा) "उमराव जान" पाहिला. ऐश्वर्याचा पाहिल्यावर मुद्दामच तुलनेचा हेतू होता. जुना खूपच जास्त आवडला हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते!

यातल्या सगळ्या आशाने गायिलेल्या खय्यामच्या रचना सुंदर आहेत.  दोन्ही चित्रपट तसे पाहिले तर अलीकडच्या काळातलेच आहेत. आणि गाण्याच्या रचनाही तशा आधुनिक आहेत. मला वाटत नाही की १८४० मध्ये लखनौमधली कोणी गायिका अगदी खय्यामच्या रचनांच्या पद्धतीने गझला गात असेल. पण हलकासा शास्त्रीय संगीताचा बाज आहे. आणि चित्रपट आर्टमूवी च्या वर्गात मोडत असल्याने एकूणच जास्त खरा वाटतो.

तर आशाच्या या चित्रपटातील गझला एकापेक्षा एक सुंदर आहेत.

१) दिल चीझ क्या है आप मेरी जान लिजिये

२) इन आंखोंकी मस्ती के मस्ताने हजारों है

३) जूस्तजू जिसकी की उसको तो ना पाया हमने

४) ये क्या जगेह है दोस्तों ये कौनसा दयार है

तशाच आशाने गुलाम अलीबरोबर म्हटलेल्या काही गझला पण अप्रतिम आहेत.

- सीमा

अवांतर - नवीन चित्रपटाविषयी - अलका याज्ञिक ही अलीकडची लोकप्रिय गायिका आहे. अन्नु मलिक विषयी बोलण्यासारखे काही नाही. ;) पण नवीन चित्रपटातली गाणी जुन्याच्या आसपासही फिरकलेली नाहीत. चित्रपटही फारच बेगडी वाटला. काव्यही फारसे आवडले नाही.