आपण जर मराठीमध्ये ब्लॉग लिहीत असाल तर बहुधा आपल्या कॉम्प्यूटरवर युनिकोडमध्ये लिहिण्याची सोय असेलच. मग अगदी सोपे काम आहे. नंदनने सुचवल्याप्रमाणे इकडून कॉपी करून तिकडे पेस्ट करा की झाले.

जर आपण लीपसारख्या सॉफ्टवेअरवर मराठी लिहून त्याचे चित्र (इमेज) ब्लॉगवर चिकटवत असाल तर युनिकोड  लिहिण्याची सोय आपल्याकडे नसण्याचीही शक्यता आहे. पण ज्याअर्थी आपल्याला मनोगत वाचता येते त्याअर्थी आपल्या ब्राउजरमध्ये तरी युनिकोड वाचण्याची व्यवस्था तर निश्चितपणे असायला हवी.

या परिस्थितीत आपण मनोगतावर लिहिलेले कॉपी करून आपल्या ब्लॉगवर पेस्ट केले तर तेथे दिसू शकेल पण त्यात सुधारणा करता येणार नाहीत. इंटरनेटवर अशा दोन खिडक्या उघडणे जरा कठीण आहे पण प्रयत्न करता येईल. वाटल्यास ते लिखाण आधी नोटपॅडवर युनिकोडमध्ये (न विसरता) सेव्ह करता येईल पण तिथे तर फक्त चौकोनांच्या रांगा दिसतील. तरीही धीर न सोडता त्याचा उपयोग करून घेता येईल. मी स्वतः हे दोन्ही प्रयोग केलेले आहेत.

एक प्रयोग म्हणून या पानावरील एखादा शब्द उचलून त्याच्याशी खेळून पहा. मजा येईल.

स्पेलचेकबरोबर माझे ग्रह कांही जुळत नाहीत. त्या प्रयत्नात लिखाणच अदृष्य होते. अगदी आताही तेच झाले. कॉपी करून ठेवलेली होती म्हणून ती चिकटवता आली.

मनोगतावर स्वागत व पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा.