मीठ कुठल्या भाजीत आणि किती जास्त झाले आहे यावर ते कसे सावरायचे हे अवलंबून राहील.  काही उपाय सुचवितो.

  1. उकडलेला बटाटा योग्य प्रमाणात घालून भाजी वाढवा.
  2. भरपूर चिरलेली कोथिंबीर घाला.
  3. लिम्बू (किंवा चिंच), वाटलेली हिरवी मिरची (किंवा तिखट) आणि साखर/गूळ घालून जास्त चमचमित करा.
  4. रसाची भाजी असेल तर त्यात जास्त पाणी घालून उकळा.
  5. पालेभाजी असेल तर त्यात शिजवलेला भात/कण्या घाला.
  6. भाजीमध्ये कडक पावाचा तुकडा घालून त्यात भाजीच रस शोषून घ्या, याने बरेच मीठ कमी होईल
  7. जमल्यास आणखी तसलीच भाजी मीठ न घालता करून ती त्यात मिसळा.

मुख्य म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला भाजी दिल्यास ते माणूस खारट भाजीसुद्धा गोड मानून खाईल याची खात्री ठेवा.

वरच्या सूचनांचा काही उपयोग झाला का ते अवश्य कळवा.

कलोअ,
सुभाष