इंग्रजीचा वापर करताना सवय, आवश्यकता, व्यसन, देखावा, छाप पाडण्याची गरज, परवशता, भाबडेपणा इतके सर्व भाव माझ्या मनात उमटतात.
एक गोष्ट आठवली. हत्तीचे पिलू असताना त्याच्या गळ्यात बलदंड साखळी बांधली जाते. पिलू बरेच प्रयत्न करते आणि त्याच्या मनात हा भाव दृढमूल होत जातो की ही साखळी आपण कधीही तोडू शकत नाही आणि तो मग प्रयत्न सोडून देतो. मग माहूत त्याला साधी दोरी बांधतो आणि अश्या जुजबी आणि तकलादू बंधनातून तो हत्ती कधीच मुक्त होत नाही.
बऱ्याच प्रमाणात आपल्या मराठीजनाची हीच अवस्था आणि स्थिती झाली आहे. शब्द साधना आपल्याला ह्या क्लैब्यातून मुक्तता देईल असा विश्वास आहे.