अनुदिनी छानच आहे.
जेवणाच्या सुट्टीत जेवायला जाताना संगणक ctrl+alt+del करुन त्याला कुलूप
लावूनच जावे. एखादा कर्तव्यदक्ष शिपाई तितक्या वेळात कळफलक मन आणि जोर
लावून पुसतो आणि त्यातून प्रोग्राममध्ये झालेली अक्षरांची भेसळ अप्रतिम
बेमालूम होते.
आमचा अनुभव थोडासा वेगळा आहे. जर संगणकाला कुलूप न लावता कोणी फिरत असेल आणि व्यवस्थापकाने ते पाहिले तर व्यवस्थापक शांतपणे येऊन मेल टाइप करत असे "सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याने मी सदर कंपनीतून राजीनामा देत आहे इ.इ." आणि सदर 'हलगर्जी गुन्हेगार' येताच व्यवस्थापक विचारत असे, हे मेल एचआर ला पाठवू का? :)