प्रतिसाद आवडला. समृद्धता हा शब्द खटकणारी मी एकटीच नाही हे समजल्याने बरे वाटले.

वैविध्य आणि विविधता, वैपुल्य आणि विपुलता पैकी कुठे कोणते वापरायचे ह्याचे नियम नसतील तर मराठीमध्ये दोन्ही शब्द समानार्थी वापरले जाणे सहाजिक आहे. पण समृद्धता हा शब्द जेवढा खटकला तेवढा विविधता खटकला नाही हे खरेच. समृद्धता असा शब्द आधी कधी वाचनात आला नव्हता, मात्र विविधता आला होता, एवढ्या एकाच कारणाने तो खटकला असे मानायला वाव असला तरी त्याने पूर्ण समाधान होत नाही. असो.