मराठी साहित्य महामंडळाच्या ८ व्या नियमानुसार फक्त मराठी शब्दांच्यापूर्वीचा उपान्त्य स्वर प्रत्ययापूर्वी ऱ्ह्स्व होतो.  अन्तरीक्ष हा संस्कृत शब्द(मराठीसाठी तत्सम शब्द): त्यामुळे प्रत्ययापूर्वीचा 'री' ऱ्हस्व होत नाही.  परंतु मराठी आणि संस्कृतमध्ये हा शब्द अन्तरिक्ष आणि अन्तरीक्ष ह्या दोन्ही प्रकाराने लिहिता येतो. त्यामुळे 'अन्तरिक्षात' आणि 'अन्तरीक्षात' दोन्ही बरोबर आहे.