स्वातिताई,

तुम्ही जर्मनीमधल्या नाताळचे (खिस्तजन्माचे) वर्णन छानच केले आहे.  तुम्हाला असे शेजारी (नातेवाईक) मिळाले त्याचे कारण तुमचा मनमिळावू स्वभाव असे वाटते.  तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून हेच प्रकर्षाने जाणवते.

तुमच्या वर्णनाने तिथले चित्र डोळ्यापुढे उभे राहतेच पण शिवाय प्रकाशचित्रे दिल्याने ते वर्णन किती उत्तम झाले आहे हेहि लक्षात येते.

तुम्ही दाखवलेली प्रकाशचित्रे सुद्धा उत्तम आली आहेत.  आजीआजोबांचे प्रसन्न चेहरे, नीट मांडून ठेवलेल्या मद्याच्या कपाटासमोर फेसाळ मद्य (शँपेन) घेऊन उभे असलेले वयोवृद्ध पण उत्साही दांपत्य, नटवलेले नाताळ झाड, तसेच देवळातले जन्मोत्सवाचे देखावे यांची चित्रे छानच आहेत.  सगळीकडे उत्तम प्रकाश झोत (फ्लॅश) वापरला आहेत.  तसेच प्रत्येक चित्राचे केंद्रीकरण (फोकसिंग) योग्य झाल्याने चित्रे स्पष्ट आणि रेखीव आली आहेत.  तुमचा चित्रक (कॅमेरा) कोणी बनवलेला आहे?  त्याची चित्रकण (पिक्सेल) क्षमता किती आहे?

असेच उत्तम लेख येऊ द्यात.

कलोअ,
सुभाष