मराठी भाषेच्या प्रेमी लोकांना आनंदाची वार्ता. सांगली येथे भारती विद्यापीठातर्फे 'ज्ञानभारती-२००४' हे पुस्तक प्रदर्शन पार पडले. त्याची काही विजयगाथा.
- शाळेच्या मुलांसाठी असलेल्या प्रदर्शनातुन १ कोटीपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री.
- सलग ११ दिवस चाललेले ( लांबलेले ) प्रदर्शन.
- यात झालेल्या अनुषंगिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद.
- अनेक नामांकित (८०) प्रकाशनसंस्थेचा सहभाग.
- मुलांनी काढलेली ग्रंथदिण्डी आणि नागरीकांचा भरभरुन प्रतिसाद.
- १५०० शाळांना पत्रातर्फे ही माहिती देण्यात आली. शहरी, ग्रामीण, दुष्काळी, डोंगरी, वाड्यावाड्याच्या सर्व प्रकारच्या आणि थराच्या शालैय मुलांचा प्रतिसाद.
असे उपक्रम अनेक उपक्रमांना नवसंजीवन देतील हे नक्की.
द्वारकानाथ.
संदर्भ - म. टा. दिंनाक - १४ मार्च.