"मित्र/मैत्रिणींनो,
मराठी विकिपिडीयावर एकही ब्युरॉक्रॅट सध्या नाही. यामुळे येथील सदस्यांच्या सांगकाम्यांना तसे बिरुद (flag) लावता येत नाही. सांगकामे वापरणार्यांनीच जर का दुसरीकडून हे बिरुद मिळवले तरच आपल्याला येथे कळते की एखादा सदस्य सांगकाम्या आहे. आपल्या विकिपिडीयावर असा एक तरी सदस्य पाहिजे ज्याला हा अधिकार असेल (सांगकाम्यांना सांगकामे म्हणण्याचा.)
मी हे काम माझ्यावर घेउ इच्छितो. यासाठी आपला पाठिंबा मिळाला तर मी विकिमिडीयावर यासाठी विनंती करेन. मी गेले १३-१४ महिने मराठी विकिपिडीयावर कार्यरत आहे. मी १६,००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत (अद्याप कोणत्याही प्रकारचा सांगकाम्या न वापरता!) व मला सांगण्यास अभिमान वाटतो की जेमतेम १,००० पाने असलेल्या या माहिती भांडारास आज ७,०००+ पानांपर्यंत मोठे करण्यात माझाही वाटा आहे. माझी यापुढेही याहून अधिक काम करण्याची इच्छा आहे. तर मला ब्युरॉक्रॅटपदासाठी आपला पाठिंबा द्यावा ही विनंती.
आपले मत विकिपिडीयाच्या कौल पानावर जरुर नोंदवा.
अभय नातू 07:23, 29 डिसेंबर 2006 (UTC)"
तळटीप: सांगकाम्या शब्द बॉट या इंग्रजी शब्दास पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो.या स्वयंचलीत प्रणालीमूळे मराठी विकिपीडियाची शुद्धलेखन वगैरे दुरूस्तीकामे मोठ्य प्रमाणावर अधिक सहजगत्या होवू शकतील. ह्या प्रणालीच्या मराठी विकसनातील आपले सहमनोगती केदार व अभय यांचे मन: पुर्वक अभिनंदन
-विकिकर