वयाची साठी उलटल्यानंतर पाठ केलेले श्लोक अशा प्रकारे लक्षात ठेवणे हा खरोखर अद्भुत स्मरणशक्तीचा चमत्कार आहे. सर्वसाधारणपणे बालपणी केलेले पाठांतर जन्मभर लक्षात राहते पण मोठेपणी शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होते.

श्री. जोशी एकाद्या विषयावरील समर्पक श्लोक व त्याचा अर्थ पटकन सांगू शकतात कां? तसे असेल तर ते लोकांचे चांगल्या प्रकारे प्रबोधन करू शकतील. भगवद्गीतेचा मुख्य उद्देश त्यामुळे जास्त साध्य होईल असे मला वाटते.