हेच शब्द वाक्यात वापरले तर यथार्थ शब्द शोधता येतील. उदा. तुला कशाचा व्यवसाय करावयाचा आहे? किंवा माझे उपजीविकेचे हे साधन आहे, माझा हाच पेशा करावयाचा विचार आहे, मला या शाखेचे शिक्षण घ्यावयाचे आहे इत्यादी इत्यादी.

मुख्य म्हणजे प्रतिशब्द आवडतोच अथवा रुचतोच असे नाही. उदा. टिप्स साठी सूचना असा शब्द सुचवला गेला. मला तो आवडला ( ? ) नाही, तरीही इतर शब्द मला न आढळल्याने हा शब्द वापरावा आणि स्थितिस्थापकत्व टाळावे असे माझे मत आहे. जाता जाता टिप्ससाठी क्लुप्ती अथवा युक्ती हा शब्द समर्पक वाटतो काय?