अत्यानंद, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुम्ही आणि तुमच्या सारख्या इतरांकरता मेघना पेठे यांच्या पुस्तकांची यादी देत आहे.
कथा :
"हंस अकेला"
"आंधळ्याच्या गायी"
कादंबरी :
"नातिचरामि"
त्यांच्या कादंबरीबद्दल अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. त्यांच्या कथांइतके या कादंबरीचे यश निर्विवाद नाही. मलाही त्या कादंबरीबद्दल काही गंभीर reservations आहेत.
>>>एखाद्या कथेबरोबरच त्याचे रसग्रहण सादर केलेत तर वाचायला जास्त आनंद होईल. तेव्हढे कष्ट घ्याल काय?
कथा नकलून काढणे हे खरेच मोठ्या जिकिरीचे काम आहे खरे. मला शक्य झाल्यास तसे जरूर करीन ; परंतु तसे वचन आताच देता येणार नाही. क्षमस्व.