आनंदघन,
नववर्षानिमित्त आपण लिहिलेला हा लेख, त्यामागचा उद्देश आवडला.
मला असे वाटते की चुकीच्या वागण्याचा राग येणे ही पहिली पायरी आहे, तो व्यक्त करणे ही दुसरी. पण दिसलेली चूक सुधारण्याचा किंवा टाळण्याचा विधायक प्रयत्न करणे ही तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे. जगामध्ये असंख्य चुकीच्या गोष्टी सारख्या घडत असतात. त्याबद्दल दुःख होते तसाच रागही येतो. पण त्यांना आळा घालणे आपल्या आंवाक्याबाहेरचे असते.

हे सगळ्यांत आवडलं / पटलं - मी तिन्ही पायऱ्या स्वतःपुरत्या अनुभवतोय. उदा. लोक गाडीचा कर्णा वाजवतात त्याचा मला राग येतो/दु:ख होतं. दुसरी पायरी म्हणजे मी तो राग कधी कधी स्वतःच्या गाडीत / रस्त्यावरून चालताना वगैरे व्यक्त करतो; पण सार्वजनिक वाहनातून (उदा. टॅक्सी) जाताना चालकाला समजावून सांगतो की कर्णा न वाजवताही गाडी चालवता येते. (तुम्ही मला वेडं म्हणाल कदाचित, ते चालकही बहुधा म्हणत असावेत. पण आपल्या परीनं जे करता येणं शक्य आहे, ते करतो. अर्थात, माझा आवाका छोटा असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात करता येत नाही त्याचा राग / खेद वाटतो.).

- कुमार

ता. क. 'ब्रह्मज्ञान' असा शब्द आहे; 'ब्रम्हज्ञान' नव्हे.