टुंड्रा/टंड्रा दोन्ही उच्चार बरोबर आहेत . यातला एक अमेरिकन असा प्रकार नाही.

'वी'चा उच्चार करताना दात खालच्या ओठावर रोवावेत, तर w मधील 'व'चा उच्चार ओठांचा चंबू करून करावा.

Withचा उच्चार विद किंवा उत्तर इंग्लंड्मध्ये विथ असा होतो.  वुइथ असा कुठेच होत नसावा.  शंका आल्यास शब्दकोश पहावा, सर्व शंका दूर होतात.

इंग्रजी शब्दांचे उच्चार व्युत्पत्ती, इतिहास, प्रघात, दुसऱ्या भाषेतून उसनवारी वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.  कट्, पुट्, बट् यांचे उच्चार असेच सिद्ध करता यावेत.

इंग्लंडमधील इंग्लिशला अमेरिकन लोक क्वीन्स इंग्लिश म्हणून हिणवतात, भारतीय इंग्रजीला इंग्लंडमध्ये नाही.