आपल्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद द्यायचा विचार आला म्हणून हा प्रपंच !
आपले मनोगतावर स्वागत....
मनोगतावर नवीन मंडळी नेहमी मराठी भाषेबद्दल भरभरून बोलताना आढळतात. मला नेहमी त्यांचे कौतुकच वाटत आलेले आहे.
माझ्या आठवणीनुसार माझेही पहिले वाहिले लेखन (कदाचित दुसरे बिसरे असेल) मराठी भाषेवरीलच होते.
आपण लेखात हिरीरीने मराठी भाषेबद्दलचा कळाकळ जसा व्यक्त केला होता अगदी तसाच मलाही मनोगतावर आल्या-आल्या होता व आजही आहेच.
आपण हा कळाकळ इतर संकेतस्थळांवर वावरतानाही असाच कायम ठेवा ही विनंती.
उरला प्रश्न लेखातल्या 'मुंबईतल्या मराठी' बद्दलचा..... काही मंडळी टाईम्स वाचतात तर काही म.टा. लोकसत्ता इत्यादी. काही 'डिनरला काय आहे' असे विचारतात तर काही 'आज जेवायला काय आहे ?' असे म्हणतात. माझ्या मते हे संस्कार आपण स्वतःच स्वतःवर करवून घ्यायचे असतात म्हणून हा व्यक्तिगत प्रश्न समजला जावा.
दुसरे- हा भाषिक घुसखोरीचा प्रश्न फक्त मराठी/मुंबई/महाराष्ट्र पुरताच मर्यादित राहिलेला नाही असा माझा थोडाफार अभ्यास आहे. हल्लीच्या गुजराती मुलांना सोडा.... त्यांच्या माता पित्यांनाही "आई/वडिलांना" गुजरातीत काय म्हणतात ते माहीत नाही. सुरत, बंगळूर, दिल्ली, कलकत्ता, जयपूर इत्यादी शहरांपर्यंत व आजूबाजूच्या गावांतूनही भैय्या लोकांनी घुसखोरी केली आहे.... ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी व थोडा फार मारवाडी वगैरे समाज उच्च शिक्षित होऊ लागलेला आहे.
"मला नाही आवडणार माझ्या मुलांनी डोक्यावर रत्नागिरीच्या प्युव्वर हापुस आंब्याची पेटी घेऊन (भैय्ये महाराष्ट्रात घुसायला नको म्हणून) दारोदारी विकावी त्यापेक्षा मी त्यांना MBBS/ENGG/MCM बनवेन" अशी प्रवृत्ती जर संकेतस्थळांवर (मनोगतासारख्या) वावरणाऱ्या सुशिक्षित पालकांची असेल तर त्यात चुकीचे काय आहे ? मात्र व्यक्ती कितीही सन्मानिय झाली तरी त्याने स्वतःची संस्कृती / स्वतःच्या मातृभाषेशी नाळ तोडता कामा नये हे मी मान्यच करतो. जर जपानी माणूस किंवा इटालियन माणसाला त्याच्या हेल काढून इंग्रजी बोलण्याची लाज वाटत नाही तर ती लाज मला का वाटावी ?
इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दलही मी मनोगतावरून बरेच काही लिहिले आहे. परवाच वयाने एक ज्येष्ठ मनोगती, जे जवळच राहतात (व्यक्तिगत उल्लेख टाळलेला आहे !) त्यांच्याशी फोनवर (दूरध्वनीवर) बोलणे झाले.
(आपला लेख वाचून अचानक त्यांची आठवण झाली)
चर्चा हीच होती.... जर मराठी माध्यमातील शाळांना मराठी हा एकच विषय मराठीतून शिकवण्याची तयारी एकीकडे राज्य सरकार करीत आहे तेथे इंग्रजी माध्यमातून शिकले काय किंवा मराठी माध्यमातून शिकले काय ह्याने काय फरक पडणार आहे ? जोवर इंग्रजी माध्यमातील मुले दहावीत पोहचेपर्यंत मराठी माध्यमातील मुलांच्या पातळीवरील 'मराठी' शिकू शकत असतील तर मराठी माध्यमांचीच पुंगी वाजवत बसण्याची गरजच काय ? जोवर तुम्ही घरातल्या घरात व्यवस्थित मुलांवर मराठी संस्कार करत नाहीत तोवर माध्यम कुठलेही असल्यास काय फरक पडणार आहे ?
माझ्या मते माणसाने काळानुसार वागावे. आज मनोगतावर मराठीत टंकाळता येतेय- गमभन/बरहा सारख्या मराठीत लेखन करण्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. मराठी मुले शिक्षण-नोकरी निमित्ताने परदेशी जाऊन अटकेपार झेंडे रोवत आहेत. इतर व्यवसायांतूनही मराठी डोकी स्पष्टपणे वर दिसत आहेत.
(माझ्या व्यवसायात माझे सहा स्पर्धक मराठी व एक गुजराती आहे !) हे सर्व घडत असताना डोक्यावर पाटी ठेवून मासे विकायला कोळ्यांच्या मुलांनी का फिरावे ? त्यांना नाही वाटत... मोठे नांव कमावून आपल्या आईवडीलांना सुखसोयी द्याव्यात ?
किरण बेदींच्या मुलाखतीत वाचलेले आठवते- त्यांना स्वयंपाक करता येत नसल्याची त्यांची खंत होती.... ती त्यांनी त्यांच्या वडिलांकडे बोलून दाखवली त्यावर त्यांचे वडील म्हणाले, 'इतका अभ्यास कर व इतकी मोठी हो की दोन स्वयंपाकी घरी नोकरीला ठेवता येईल अशी ऐपत मिळव'...
जर भैय्या मंडळींना शिकून पुढे जाण्या ऐवजी डोक्यावर टोपल्या मिरवत हमालीच करायची असेल तर त्याला मराठी माणूस काय करू शकेल ?