दै. सकाळ ची बातमी(सोमवार,२५ डिसें.- मुंबई टुडे)
नमस्कार,
जय महाराष्ट्र!
दै. सकाळमध्ये बातमी वाचली ती अशी- 'अट्टाहास मराठीचा' आणि 'भुमिपुत्र सेवासंघ'या संघटनांनी मराठीची अस्मिता जपत दादर आणि परळ रेल्वेस्थानकात लावलेली ही पोस्टर्स सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहेत. त्या पोस्टर्सचे स्वरुप पुढीलप्रमाणे
दै. सकाळ ची बातमी(सोमवार,२५ डिसें.- मुंबई टुडे,पान क्र. ३)
________________________________________
मराठी मुंबईचा मालक एकटाच मराठी माणूस !
इंग्रजी ही देशद्रोही-परकिय भाषा आहे.हिंदी ही
परप्रांतीय भाषा आहे त्याच्यावर बंदी घाला.
भारत हे राष्ट्र नाही .हिंदी ही राष्ट्रभाषा नाही!
भारत हे भाषांवर आधारीत संघराज्य आहे !!
मराठी भाषेच्या एकभाषिक राज्यात
म्हणजेच मुंबई महाराष्ट्रात राज्य घटनेचे
३७० कलम
वापरायला सुरुवात करा!!
मराठी माणसाची (भारताची )लोकशाही वाचवा
मराठी भाषेचे शस्त्र आणि अस्त्र वापरा!
संपुर्ण मुंबईतील जमीन व्यापार आणि
नोकऱ्या या फक्त मराठी माणसाच्याच !
जागतीकीकरण ,ग्लोबलायझेशन,इंटरनॆशनल या
फसव्या नावाखाली जागतीक बॆंकेच्या मालकाला
मराठी मुंबई गिळंकृत करायची आहे!
महाराष्ट्रात राहायचं तर मराठीच बोलायच !
________________________________________
मराठी भाषाभिमान असणाय़ांनी संपर्क साधावा :
अट्टाहास मराठीचा आणि भुमिपुत्र सेवासंघ
कार्यालय : २४२२०४७१.
________________________________________
कृपया या पोस्टर्स बाबत आपले मत आपण व्यक्त करावे.
आपला
कॉ.विकि