तुमच्या अनेक कविता वाचून हे लिहित आहे.

शीघ्रकाव्य वाटावे इतक्या जलदतेने कविता करायची तयारी, छ्न्दावर पकड, विनोदबुद्धी हे सारे विडंबनासाठी आवश्यक असलेले तुमच्यातले गुण पाहता, मलविसर्जन, मद्यपान, व्यभिचार, शारीरिक विकृती (थोडक्यात म्हणजे आहार निद्रा भय ... इ.)वरच्या विनोदाहून आता सामाजिक दोष, भ्रष्टाचार, ढोंग, लबाडी अशावर रोख ठेवून केलेल्या 'वरच्या यत्तेतल्या' विडंबनाची तुमच्या कडुन अपेक्षा केली तर तुम्ही ती नक्कीच पुरी कराल ह्याची खात्री वाटते.