मुंबईत बॉम्बस्फोटांच्या मालिकेने साऱ्या जगाला हादरवले. पण दुसऱ्या दिवशीच शहर पुन्हा पूर्वपदावर आले, त्याबद्दल सर्वांनी मुंबईकरांना सलाम केला. प्रत्यक्षात हे शहर मृत झाल्याचे लक्षण आहे.
बिलकुल पटले नाही!
मुंबई शहर हे धैर्याने या प्रसंगाला सामोरे गेले.
मदतीसाठी समाजाच्या सर्व थरातील माणसे पुढे सरसावली. देशी आणि विदेशी उद्योगांच्या मनात "मुंबई हे धोकादायक शहर आहे" अशी शंका क्षणभरही डोकावलेली दिसली नाही. (हा उद्देश नाही पण महत्त्वाचा परिणाम तरी नक्कीच आहे.) दिवसोंदिवस चालणाऱ्या जातीय दंगली उसळल्या नाहीत.
हे शहर जिवंत आहे... अनुभवातून शिकणारे आहे... पुढे झेपावणारे आहे असेच मुंबई स्फोटानंतरच्या घटनातून दिसते.