तात्या,
जर्मनी आमची नाही रे,आमचा भारत! :) आजी आजोबांना गीतरामायणातली गाणी आवडली.तिने दिनेशला काही गाण्यांची सिडी करून मागितली आहे.
अत्यानंद,
जुन्या हार्डकोअर जर्मन मंडळींना भारतीय आर्य आहेत हेच मान्य नाही!पण भारताबद्दल आणि विशेषतः आयुर्वेदाबद्दल कुतुहल आहे,गम्मत म्हणजे आपल्या जुन्या आजीच्या बटव्यातल्या घरगुती औषधांबद्दल सुद्धा त्यांना नवलयुक्त कुतुहल आहे.
आनंदघन,
तुम्ही दिलेले गणेशोत्सवाचे फोटो छान आणि पुरेसे बोलके आहेत.
भाष,
आमचं छबीयंत्र ४,५ वर्षं जुनं आहे. 'सोनी'चा ३.१ पिक्सलचा साधा चित्रक आहे पण ओसाका (जपान)मधल्या सोनीच्या शोरुम मधून घेतलेला आहे.
दिनेश उत्तम छायाचित्रे काढतो,त्यामुळे चित्रांचे श्रेय त्याला!तुम्ही सगळ्या चित्रांचे रसग्रहण छानच केले आहे.
अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्मिता,मृदुला,माधवराव,हॅम्लेट
लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल आपल्यालाही मनःपूर्वक धन्यवाद.
स्वाती