सीबीएसई अभ्यासक्रमात चार भाषा शिकाव्या लागतात, त्याही वरच्या दर्ज्याच्या. एस्एस्सी सारख्या कमी दर्ज्याच्या तीन/चार नाहीत. त्यांना संस्कृत सुद्धा ५वी/६वी पासून असते. ४ भाषा या प्रमाणे:- हिन्दी, इंग्रजी, फ़्रेन्च आणि चौथी (फ़्रेंच सोडून दुसरी) विदेशी किंवा, प्राचीन(संस्कृत, लॅटिन, पाली इत्यादी) किंवा आधुनिक भारतीय भाषा(यात मराठी येते ). ज्याला हवे असेल तो मराठी घेऊ शकतो. मराठीची सक्ती अनावश्यक आहे.
अधिक माहिती साठी http://www.cbse.nic.inवर जा आणि syllabus ला जाऊन 'मराठी'वर टिचकी मारा.
सीबीएस्ई अभ्यासक्रम फ़ार चांगल्या प्रतीचा आहे. ते 'NCERT'ची पुस्तके वापरतात. दहावी मराठीसाठी तर 'श्यामची आई' आहे. त्यांना 'एस्एस्सी'च्या थराला उतरवू नये.