मेघना पेठे यांच्या साहित्यविश्वाचा आपण चांगला परिचय करून दिला आहे. त्यांच्या लिखाणातला थेटपणा पाहता कधीकधी गौरी देशपांडेंच्या सुरुवातीच्या लेखनाची आठवण येते. अर्थात दोघींची अशी तुलना करणे अयोग्यच आहे.

तात्या म्हणतात तसे हल्लीच्या काळातल्या मराठी लेखनप्रवाहाचा आढावा या निमित्ताने आपण मनोगतावर घेत गेलात तर फारच चांगले होईल.
निदान मनोगतावरील वीस-तीस वर्षांआधीचे जुने साहित्य, जुने संगीत, इ. वर भर देऊन काहीसे स्मरणरंजनात्मक विचार/भावना मांडणाऱ्या लेखांमुळे अंमळ एका बाजूला पारडे झुकलेले आहे त्यात शेअरबाजारासारखी थोडीशी तरी दुरुस्ती होईल.
माझे हे मत वाचून बहुधा वरिष्ठ मनोगती नाराज होतील पण नव्या हवेची झुळूक मनोगताला अद्यतन राहण्यात व त्याचे आयुष्य वाढवण्यात मदतच करेल असे मला तरी वाटते.
ही नवी बादे-सबा येथे आणल्याबद्दल, मुक्तसुनीत, तुमचे पुन्हा एकदा आभार.
दिगम्भा