आभास,
सर्व लेख एका बैठकीत वाचले व अतिशय आवडले.
उस्मानखाँ थोरच वाटले. पण गुरु-शिष्य नात्याविषयी आपण इतके हृद्य व सुंदर लिहिले आहे की त्या नात्याचे मर्मच येथे प्रगट झाले आहे. गुरू का हवा असतो आणि तो काय करतो हे या निमित्ताने येथील सर्वांना कळेल.
शास्त्रीय संगीताची आपल्याला आवड आहेच. मग आपल्या संगीत शिक्षणाविषयी सर्व तांत्रिक बाबींसह आणखी तपशीलवार लिहिलेत तर आमच्यासारख्या सामान्य पण जिज्ञासू रसिकांना अधिकच आवडेल आणि त्याचा खूप लाभ होईल. असे लेखन वाचायला उत्सुक असणारे लोक (अल्पसंख्य का होईना) येथे डोळे लावून बसले आहेत याची नोंद घ्यावी ... आणि लिहीत रहावे.
अशिक्षित पण समानधर्मा,
दिगम्भा