मला असे वाटते की चुकीच्या वागण्याचा राग येणे ही पहिली पायरी आहे, तो व्यक्त करणे ही दुसरी. पण दिसलेली चूक सुधारण्याचा किंवा टाळण्याचा विधायक प्रयत्न करणे ही तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे.

खरयं !
फ्रेंच राज्यक्रांती घडली तेव्हा लाखो लोकं रस्त्यावर एकदम उतरले नव्हते... एकाने पुढाकार घेतला व इतरांनी त्याचे समर्थन केले.
हाच भाग १८५७ (हे वर्ष १५० वे वर्ष आहे व मी स्वातंत्र्य लढ्यावरील एखाद्या लेखाची - माझ्या मित्राकडून- चातकासारखी आतुरतेने वाट पहात आहे !) चा लढा वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरू झाला असला तरी त्याला 'नायक' होता
कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय काहीच होत नसते...
हा प्रकृतीचा नियम आहे असे वाटते.

आपण अगदी धुतल्या तांदुळासारखे निष्कलंक असतो कां?

असे 'कोणी' च नसावे असे दिसतेय !

कशावर टीका किंवा कोणाला उपदेश वगैरे करायचा माझा हेतू नाही.

हो खरं आहे, हल्ली तसे मनोगतावर जमतच नाही !

पण म्हणून त्रागा करावा कां

कधीच नाही.

अवांतर- लेखन सुरेख आहे. विचारपुर्वक चार पांच वेळा वाचून आपल्याप्रमाणेच मी ही ह्या नविन वर्षाचा असाच निर्धार करेन असा विचार करतोय.