'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटाविषयी अधिक माहिती नेटवर शोधत असताना मनोगताच्या या दुव्यावर येऊन पोचले. :-) आणि लगेच मनोगताची सदस्यही झाले.

'मुलगी पाहणे' किंवा 'यंदा कर्तव्य आहे' यावरील ही चर्चा पाहून बरं वाटलं. अशा चर्चा होणं खूप गरजेचं आहे. मला आलेले अनुभव आणि मतं मी माझ्या ब्लॉगवर मांडली आहेत. ते लिखाण बऱ्यापैकी लांबलचक असल्याने इथे देत नाही. :-) ते खालील दुव्यावर पाहता येईल.

http://manasokta.blogspot.com/2006/09/blog-post_28.html