रोज खाऊनी मिस्सळ 'पोट' वाढले
अन् हात थकले; परंतू प्राण वाचले...
सदऱ्यात मावणार व्यक्तिमत्व हे कसे?
पाहुनी हे जनात मीत्र मनी हासले....
कैक बॉटले अशीच फोडली बसून मी.....
(नेहमीच होते बघुनी हेची मीत्र बोलले !)
रोज लिहीतो इथे अन् घाम गाळतो परी
प्रतिसाद जरी द्वाड हा, तरी ना चाळलो......
आज शोधतो "स्वर" हा मुळात चांगला.....
"गाव" गाजवेल अन वाटेल तो भला....
"माधवा" पुरे.... तुझे मी "शब्द" झेलले
लाज आली अन अता हे 'छंद' थांबले..... !
- मैफिलितल्या माईक न सोडणाऱ्यांनो मला माफ करा !