परीताई आणि बदकराव,
(तुमच्या जोडनावाला संबोधनाच्या सोयीसाठी काहीतरी मुरड घालता येईल काय? ह̱̱. घ्या. पण तेवढी सोय करायचा विचार केलात तर उपकृत होईन,  राव/ताई)
येथे ज्ञानापेक्षा अनुभवाचा अधिक आधार घेऊन सांगावे लागत आहे.
पूरियामधील धैवत "श्रुतिप्रधान" असल्याबद्दल मी स्वत: ऐकलेले नाही - मनोगतावरील व अन्य संगीतज्ज्ञांकडून आणखी सखोल मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.
माझ्याकडून हा प्रश्न मी डॉ. ओकांकडे पाठविण्याची व्यवस्था करतो, मग बघू काय उत्तर येते ते.

तसेच पूरियामध्ये कोमल धैवत घेतलेलेही मी ऐकलेले नाही. माझ्या अल्पज्ञानावरून मग तो राग पूरिया न राहता पूर्वी, पूर्वा, पुर्ब्या असा काहीतरी होईल असे वाटते (थाटही बदलून मारव्याऐवजी पूर्वी होईल). या निमित्ताने डॉ. राजन पर्रीकरांचे लेखन पुन्हा एकवार चाळले, त्यातही असा उल्लेख मिळाला नाही. म्हणजे पुन्हा- तज्ज्ञांच्या मताची आवश्यकता आहे.

थोडक्यात: माझा अनुभव सांगितला आहे, आता तज्ज्ञांनी काय तो निर्णय द्यावा. मीही त्याची वाट पहातो.
दिगम्भा