प्रसाद,
पुन: एकदा अप्रतिम गझल...
अतिशय सहज-सुंदर आहे, सगळेच शेर सुरेख! (एकाला चांगलं म्हणणं म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखं होईल).

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये! 

हा मतला फारच आवडला. डसू नये सारखा अगेय / रुक्ष शब्द या गझलेत खटकत नाही. 

कसू नये ही वैभवची सूचना पण आवडली.

- कुमार